सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक सांस्कृतिक विद्यारंग महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या शाळेतील चिमुकल्यांनी विविध कलाविष्कार सादर केले.
सुपे येथील या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन सोलापूर विभागाचे पोलीस मोटार वाहतूक अधिकारी अंबर निंबाळकर यांनी केले. यावेळी येथील शाळेचे मुख्याध्यापक डॉ. योगेश पाटील, येथील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दत्तात्रय शिंदे, अमर भोसले, सोलापुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बिचकर, सोलापुरचे हेड कॉन्स्टेबल एम. बी. स्वामी व पालक उपस्थित होते.
विद्यारंग या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. त्यामध्ये महाराष्ट्राची ग्रामीण जीवनशैली, किर्तन, जिजाऊंची जीवनगाथा, देशभक्तीपर गीत, कोळी गीत, धनगर लोकगीत, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली गीते, गणेशवंदना, श्रीकृष्ण जीवन परीचय या व अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. इम्रान तांबोळी व राबियाबसरी तांबोळी आणि निलेश खैरे व पुजा खैरे या सर्वांनी सहकुटुंब सादर केलेले ' हसते हसते कट जाए रस्ते' हे नृत्य उपस्थितांना प्रचंड आवडले. तसेच स्वच्छ भारत अभियान या सादरीकरणातून स्वच्छतेचा संदेश देणारे नाटक विद्यार्थ्यांनी सादर केले.
दरम्यान या सांस्कृतिक सोहळ्याबरोबरच उपस्थितांसाठी खाऊगल्लीचेही आयोजन करण्यात आले होते. या खाद्य महोत्सव खाऊगल्लीमध्ये दाबेली, वडापाव, पावभाजी, साउथ इंडियन फूड, चायनीज फूड, मांसाहारी पदार्थ, बिर्याणी या सर्व पदार्थांचा समावेश होता. या सर्व खाद्य पदार्थांचा पालकांनी मनमुराद आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या घोडके, अंकिता वाबळे, भाग्यश्री वाबळे, वैष्णवी खोमणे, आर्या केदारी, स्वप्नजा रसाळ यांनी केले. तर दादा राऊत यांनी आभार मानले. ....................................
COMMENTS