Baramati News ! चौधरवाडी ग्रामस्थ 'भाची'च्याच पाठीशी : पवार साहेब आणि सुप्रिया ताईंनाच साथ देणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप 
आज दि. २८ खासदार सुप्रिया सुळे ह्या बारामती तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर असताना आपले आजोळ असलेल्या चौधरवाडी गावाला देखील भेट दिली. चौधरवाडी ही शरद पवार यांची सासुरवाडी तर सुप्रिया सुळे यांचे आजोळ. मामाच्या गावाच्या लोकांचा जेवणाचा पाहुणचार खा. सुळे यांनी घेतला, लहान थोरांची विचारपूस केली. यावेळी काही चौधरवाडी ग्रामस्थांनी आम्ही पवार साहेब आणि सुप्रिया ताई यांना सोडणार नाही, त्यांच्या सोबतच राहणार असे सांगितले. 
           बारामती तालुक्यात सस्तेवाडी, मगरवाडी, वाकी, चोपडज, चौधरवाडी, करंजे आणि शेंडकरवाडी या गावांमध्ये आज त्यांचा संपर्क दौरा पार पडला. याप्रसंगी चौधरवाडी गावात व पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयावर आपली भूमिका मांडली. याप्रसंगी ज्येष्ठ नेते सतीश खोमणे, अॅड. एस. एन. जगताप, उद्योजक राजेंद्र जगताप, सरपंच शशांक पवार, उपसरपंच तानाजी भापकर, प्रदीप भापकर, सुरेश पवार, पोपटराव पवार, सुखदेव शिंदे, पंडीतराव दरेकर, वनिता बनकर, माजी सरपंच प्रदीप कणसे, प्रदीप शेंडकर उपस्थित होते.

सुळे म्हणल्या, काँग्रेसच्या काळात जे जे उभं राहिलं ते ते सरकारने विकालया काढलेलं आहे हे आता वाडीवस्तीपर्यंत पोचलं आहे. भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी असून घर फोडा, पक्ष फोडा, महिलांना त्रास द्या असे काम करणारी पार्टी आहे. वॉर्शिंग मशिनमध्ये घालून भ्रष्ट लोकांना स्वच्छ करायचं यंत्र त्यांच्याकडे आहे, अशी परखड टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच, २०२४ ला सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जाईल आणि घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित घरी येईल, असे आश्वासनही दिले.  
               
याप्रसंगी सुळे पुढे म्हणाल्या, येत्या निवडणुकीत इडी, सीबीआय, आयकर खात्याचा वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंतच्या नव्वद टक्के धाडी या विरोधी पक्षाच्या लोकांवर टाकल्या आहेत. निवडणूक जवळ आल्या आणि प्रियांका गांधी सक्रीय झाल्या त्यामुळे वड्रा यांचं नाव कुठेतरी येणारच. विरोधकांच्या सभांनासुध्दा केंद्र, राज्य त्रास देत आहे. आमच्या आक्रोश मोर्चाच्या ३० डिसेंबरच्या सभेसाठी परवानगी द्यायलाही त्रास झाला. संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडले म्हणून त्यांनी माझं निलंबन केलं ही दडपशाही आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढत राहणार. सन २०२३ माझ्यासाठी अवघड होतं. एकाबाजूला मंत्रीपद आणि दुसऱ्या बाजूला कष्ट करणारे वडील. मी वडील निवडले. आता माझी लढाई भाजपच्या विचारसरणीशी आहे. काँग्रेसच्या काळात वीज, शिक्षण, पाणी, आरोग्य, आयआयटी, आआयएम, इमारती, रस्ते, टिव्ही, मोबाईल अशा अनेक गोष्टी आल्या. मागच्या दहा वर्षात यांनी काय केले? फक्त पक्ष फोडले आणि घरं फोडली. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार म्हणणाऱ्या सरकारला मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत यांच्या आरक्षणाबाबत न्याय देता आला नाही, अशी टिकाही सुप्रिया सुळे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आम्ही स्वागतच करणार आहोत फक्त त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दुःख समजून घेऊन निर्यातबंदीचा निर्णय़ मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले तसेच पवार यांचे काल नितीन गडकरी यांनी जाहीरपणे कौतुक केले होते. यावर सुळे यांनीही, नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे व राज्याचे दिलदार नेते आहेत. त्यांचे व आमचे चाळीस वषांचे ऋणानुबंध आहेत असे कौतुक केले.
--------------
To Top