सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याचा विकास हा होतच आलेला आहे आणि पुढील काळातही होणार आह.मात्र तालुक्याच्या विकासाबरोबर सर्व सामान्य जनतेचे आरोग्य महत्त्वाचे आसल्याचे प्रतिपादन राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या मानद सचिव स्वरुपा थोपटे यांनी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमेश एजुकेशन फाऊडेशनच्या वतीने रुग्णालयास व्हेटिलेटर वाटप करतेवेळी केले.
यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे,उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डाँ.पांडुरंग दोडके,खरेदी विक्र संघ अध्यक्ष अतुल किंद्रे उपाध्यक्ष अतुल शेडगे,संचालक विजय शिरवले,नरेश चव्हाण,संपत दरेकर,राजाराम तुपे,अनिता गावडे,विठठल करंजे,दिलीप वरे,मधुकर कानडे, डॉ.अक्षय वाघमारे,योगेश गरुड,चंद्रकांत मळेकर,लक्ष्मण पारठे,पुष्पा गायकवाड व नागरिक उपस्थित होते. प्रस्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनाची महिती प्रथमेश एजुकेशन फाऊंडेशनचे केंद्र प्रमुख योगेश गरुड यांनी दिली.पुढे बोलताना स्वरुपा थोपटे म्हणाल्या प्रथमेश एजुकेशन आरोग्य विषयक काम चांगले असुन आरोग्याची गरज ओळखुन व्हेटिलेटर वाटप केले हे कौतुकास्पद आहे.भोर तालुक्यात विकासाबरोबरच तालुक्यातील जनतेचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे.
COMMENTS