बारामती ! सोमेश्वरनगर येथे पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद मुंबई या संस्थेचा वर्धापन दिन पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर घेवुन साजरा करण्यात आला. 
     शिबिराचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष पी के जगताप, मुरूमचे सरपंच संजयकुमार शिंगटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना जगताप म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. सकारात्मक गोष्टी व समस्या अशा दोन्ही बाजू समाजासमोर मांडताना त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते त्यामुळे अशा प्रकारच्या शिबिरांची गरज आहे. 
   परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, राज्याध्यक्ष शरद पाबळे, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाघळवाडी येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे शिबिर संपन्न झाले. यावेळी माळेगावचे माजी सरपंच तुषार अडागळे, शरद निकम, विजय पाटोळे उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, उपाध्यक्ष संभाजी काकडे, सचिव संदीप आढाव यांनी केले होते. यावेळी जिल्हा प्रतिनिधी चिंतामणी क्षीरसागर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका अध्यक्ष राजेश वाघ, सुनील जाधव, संतोष भोसले, शंतनु साळवे उपस्थित होते. शिबिर पार पाडण्यासाठी साई शिवम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल शिंदे डॉक्टर विद्यानंद भिलारे व त्यांच्या स्टाफने सहकार्य केले. यावेळी २० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
To Top