सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्यात सोमेश्वरनगर-वाघळवाडी (ता. बारामती) गावचे हद्दीत विशाल संजय चव्हाण ( वय ३३, रा.वाल्हे ता.पुरंदर) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. ४ डिसेंबर पासून चव्हाण बेपत्ता असल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्याला दाखल झाली होती. संबंधित व्यक्तीचा शोध घेत असताना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघळवाडी येथील निरा डाव्या कालव्यात विशाल संजय चव्हाण यांचा मृतदेह आढळून आला. कौटुंबिक कारणावरून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत मृताचे चुलते सुनील ज्ञानोबा चव्हाण (रा. वाल्हे ता. पुरंदर) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या करंजेपूल दुरक्षेत्रात नाहीतर संदर्भात माहिती दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रमेश नागटिळक करत आहेत.