सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
ग्राम सुरक्षा यंत्रणा अतिशय महत्वपूर्ण यंत्रणा असुन चोरी दरोड्याच्या घटने बरोबर इतर ग्रामसभा, वनवे, अपघात इत्यादी घटणांसाठी उपयोगी पडणारी यंत्रणा आहे. एका कॉलवर घडणाऱ्या घटणेबाबत तात्काळ सामान्य माणसापर्यत माहीती पोहचून तात्काळ मदत उपलब्ध करण्याच काम या सुरक्षे यंत्रणेमार्फत चालणार असल्याने या ग्राम सुरक्षा यंत्रणेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ग्राम सुरक्षा यंत्रणाचे संचालक डि.के.गोर्डे यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी यांच्या प्रयत्नातून व सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत मेढा पोलीस स्टेशन मार्फत ग्राम सुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन मेळावा मेढा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमास मेढा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि संतोष तासगावकर, सपोनि अश्विनी पाटील, ग्राम सुरक्षा यंत्रणाचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे, ग्राम सुरक्षा यंत्रणा संपर्क अधिकारी सतिश शिंदे ,गोपनीय अंमलदार अभिजीत वाघमळे, यांच्यासह मेढा पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव, अशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. याप्रसंगी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के.गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन मा.श्री संतोष तासगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा पो.स्टे यांनी केले. उपस्थितांचे आभार पोलीस पाटील सुहास भोसले यांनी मानले.
----------------------
ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब, प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करणेबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत.
COMMENTS