सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई पोलीस ठाणे येथे काही दिवसांपूर्वी रामचंद्र पांडुरंग जमदाडे यांची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केले होते.
वाई तपास पथकाने त्यांचे सव्वा लाख रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तसेच शंकर पांडुरंग राजपुरे यांच्या घरात काही दिवसापूर्वी तांब्याची जुनी भांडी तसेच गॅस गॅसची चोरी झाली होती.सदर गुन्हा उघड करून तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.दोन्ही घटनेतील मुद्देमाल आज मा. न्यायालयाचे आदेशाने मूळ मालकास परत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, बिपिन चव्हाण, पोलीस हवालदार अजित जाधव, भाऊसाहेब धायगुडे, पोलीस अंमलदार प्रसाद दुदुस्कर, गोरख दाभाडे,हेमंत शिंदे श्रावण राठोड,नितीन कदम, प्रेम शिर्के, स्नेहल सोनवणे यांनी केली आहे.