सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ खोऱ्यातील दुर्गम डोंगरी भागातील रायरी ता.भोर येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ३ कोटी ४१ लक्ष निधीतून मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन भोर- वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सोमवार दि.४ रोजी करण्यात आले.
जलजीवन योजनेच्या पाणीपुरवठ्यामुळे रायरी गावची कायमस्वरूपीचे पाणीपुरवठा प्रश्न सुटणार असून लवकरच काम पूर्ण केले जाणार आहे.यावेळी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा गितांजली शेटे, मा.जिल्हा परिषद सदस्या गिताताई आंबवले, निगुडघर मा.सरपंच किसन कंक, ह.भ.प.नामदेव महाराज किंद्रे,आपटीचे सरपंच शंकर पारठे, तालुका किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष संजय मळेकर, रायरी सरपंच सुनीता किंद्रे,उपसरपंच संजय कींद्रे, लहू किंद्रे ,तंटामुक्ती अध्यक्ष किसन किंद्रे,नावजी किंद्रे, सखाराम किंद्रे,सुमन साळुंखे, कोमल किंद्रे, अलका किंद्रे,सूर्यकांत किंद्रे आदींसह ग्रामपंचायत सदस्य,महिला, तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.