सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवार (ता. ०५) पासून मेरू विद्यामंदिर वाघेश्वर (ता. जावली) येथे संपन्न होणार आहे. हे प्रदर्शन तीन दिवसांसाठी सुरु राहणार असून यात तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गतशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी केले आहे.
मेरू विद्यामंदिर, वाघेश्वर येथे उद्या (ता.०५) पासून ५१वे जावली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरु होणार आहे. हे प्रदर्शन तीन दिवस चालणार असून समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा या प्रदर्शनाचा मुख्य विषय असणार आहे. तर आरोग्य, जीवन, शेती, दळणवळण आणि वाहतूक , संगणकीय विचार हे या प्रदर्शनाचे उपविषय असणार आहेत. यात मंगळवार रोजी उपकरण नोंदणी, उदघाटन, व्याख्यान असे कार्यक्रम पार पडणार आहेत. तर बुधवार रोजी परीक्षण, निबंध, व प्रश्नमंजुषा तसेच गुरुवार रोजी पारितोषिक वितरण व समारोप समारंभ असे कार्यक्रम होणार आहेत. या प्रदर्शनाचे उदघाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले यांच्या हस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी प्रा. डॉ. व्ही.डी. धोंडगे यांचे व्याख्यान होणार आहे. या प्रदर्शनासाठी तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी केले आहे.