सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील उत्रोली गावचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवाजीराव शिवतरे यांना स्वर्गीय रामभाऊ बराटे (मां.सभापती,बांधकाम व आरोग्य, जिल्हा परिषद पुणे) यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने सोमवार दि .४ पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
रणजीत शिवतरे यांची भोर तालुक्यासह पूर्ण जिल्ह्यात विकास कामांविषयीची तळमळ तसेच जनतेशी असणारे सलोख्याचे संबंध या धर्तीवर आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार वितरण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी अध्यक्ष उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ उल्हासदादा पवार,संत साहित्य अभ्यासक सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी चंद्रकांत भाठे,विठ्ठल शिंदे, प्रकाश तनपुरे, मनोज खोपडे ,केतन चव्हाण ,सचिन पाटणे, शंकर कडू, पिंटू खोपडे ,विलास वरे, बबन साळेकर आदींसह भोर तालुक्यातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS