सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील ६ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी अवनिश विनोद होंगेकर यांने ऑलिंपिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
दि. २ डिसेंबर रोजी पुणे येथे आयोजित ऑलिंपिक स्पर्धेमध्ये १२ वर्षाखालील १४ ते ५० किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावून सिल्व्हर मेडलची कमाई केली.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. अवनिशने
मिळवलेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक ,क्रीडा शिक्षक तसेच विद्या प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळांनी अभिनंदन केले.
COMMENTS