सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्याची दारूमुक्त तालुका म्हणून ओळख असताना अवैध दारू धंदेवाल्यांच्या चढाओढीच्या वादावादीत अखेर तनवीर पठाणवर जीवघेणा हल्ला झाला. या घटणेतील चार संशयितांना पोलीसांनी अटक केली असून दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. याबाबत मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.न्यायालयाने त्यांना १६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर अटक करण्यात आलेल्या एकास अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेढा शहराअंतर्गत वेण्णा शाळेच्या जवळ तनवीर हमीद पठाण वय ३४ रा. मेढा याच्यावर सायंकाळी ८.३० वाजता कोयत्याने वार करण्यात आले. तनवीर पठाण यास उपचारार्थ ग्रामीण रुग्नालयात दाखल करण्यात आले असता त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन करंजेकर, गणेश शिंदे, सनी कासुर्डे, प्रेम पार्टे, ऋतिक पार्टे आणि एक अल्पवयीन संशयीत आरोपी सर्व राहणार मेढा तालुका जावली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील सहा संशयित आरोपींपैकी गणेश शिंदे, सनी कासुर्डे हे फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. संशयित आरोपीच्या विरोधात एन सी फिर्यादीने दाखल केल्याचा रागातून घटणेचा गुन्हा दाखल झाला असला तरी अवैध दारु धंद्यातुन घटणा घडली असल्याची चर्चा सुरू आहे. मेढा शहरात खळबळ निर्माण झाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम,सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी त्याचप्रमाणे भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनी रमेश गर्जे,सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह रॅपिड ऍक्शन फोर्स ची एक तुकडी व अतिरिक्त पोलीस कुमक यांनी मेढ्यात रात्री उशिर पर्यत ठिया दिला होता. मेढा पोलीस ठाण्यात गु.र नं 233/2023 IPC-307,143,147,148,149,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुह्याचा तपास सपोनि संतोष तासगावकर करीत आहेत.
COMMENTS