सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
राज्यात सध्या विवीध समाजाचा आरक्षणाच्या मागणीचा विषय चर्चीला जात असुन यावर तात्काळ तोडगा निघणेसाठी बिहार राज्याच्या धर्तीवर राज्यातही सरकारने लगेचच जातनिहाय जणगणना करावी अशी मागणी सोमेश्वर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केले आहे. यासाठी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व विधानमंडळाचे सचिव यांच्याकडे लेखी स्वरुपात मागणी केली असल्याची माहिती नितीन यादव यांनी दिली.
राज्यात जातनिहाय जणगणना करण्याचा ठराव सर्वानुमते महाराष्ट्राच्या विधीमंडळाने केंद्र सरकारकडे ८ जानेवारी २०२० रोजीच मंजुर केला होता. हा ठराव पारीत होवुनही त्याची अदयाप अंमलबजावणी न झाल्याने बिहार राज्याच्या धर्तीवर तात्काळ जातनिहाय जणगणना करण्यात यावी अशी मागणी यादव यांनी केली आहे. याबाबत निर्णय न झालेस उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे यादव यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. सध्या राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात हा निर्णय होणे अपेक्षित आहे. यावर राज्य सरकार काय निर्णय घेते हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
COMMENTS