सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश व्हावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जी आंदोलने व उपोषणही झाली त्यातीलच एक खंडाळा तालुक्यातील लोणंद नगरपंचायतीसमोर धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणास गणेश केसकर 20 दिवस बसले होते.
यावेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या काळात धनगर समाज बांधवांनी वेगवेगळी आंदोलने केली यामध्ये कॅण्डल मार्च. मोटर सायकल रॅली. लोणंद सहित संपूर्ण खंडाळा तालुका बंद. नीरा नदीमध्ये घेतलेले जलसमाधी आंदोलन. तसेच सुमारे सहा तास रोखून धरलेला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अशी अनेक आंदोलने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घेण्यात आली.
वीस दिवसाच्या उपोषण काळात अनेक राजकीय नेत्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु गणेश केसकर उपोषणावर ठाम होते पुणे बेंगलोर महामार्ग रोखल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन करून गणेश केसकर यांच्याशी चर्चा केली त्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात भेट घेण्यासाठी बोलवले.
या अनुषंगाने नागपूर येथे उपोषण करते गणेश केसकर खंडाळा तालुक्याचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. पुणे बेंगलोर महामार्ग रोखल्यानंतर धनगर बांधवावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेतले पाहिजेत अशी त्यांनी मागणी केली. या चर्चेवेळी त्यांच्या समवेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई व लोणंद येथील धनगर समाज बांधव उपस्थित होते
धनगर समाज बांधवांनी उपोषण स्थळी पाठिंबा दिल्याबद्दल गणेश केसकर यांनी आभार मानले.
COMMENTS