Wai Breaking ! असा जीव मारत किती दिवस जगायचं ? एकतर आम्हाला न्याय द्या..किंवा आत्मदहनाला परवानगी द्या : थोरवे कुटुंबाचे प्रांताधीकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील व्याहळी येथील थोरवे कुटुंबाचे प्रांताधीकारी कार्यालयाबाहेर आत्मदहनाच्या परवानगीसाठी आंदोलन करण्यात आले.
          सविस्तर वृत्त असे की वाई तालुक्यातील व्याहळी येथील विक्रम साहेबराव थोरवे,. मोनिका विक्रम थोरवे यांच्यासह कुटुंबियांनी भूमापन सर्वे नंबर ९० मधून १ व २ मधील नकाशात मूळ सरकारी रस्ता आहे असा मूळ रस्ता सोडून स्थानिक लोक व त्या सर्वे नंबर मधील खातेदारांच्या हेकेखोर पणामुळे मनमानी रस्ते काढू इच्छित आहेत. पोलिस प्रशासन व महसूल विभाग याकडे दुजोरा देत असल्याचे दिसून येत आहे त्यास थोरवे कुटुंबियांनी हरकत घेतली असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी वाई उपविभागीय अधिकारी वाई विभाग यांना अर्ज देऊन वाई प्रांत कार्यालयाच्या बाहेर बुधवारी हे  आंदोलन करण्यात आले.
To Top