सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबाडे ता.भोर येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा(अखंड हरिनाम सप्ताह) चे औचित्य साधून पहिल्याच दिवशी वारकऱ्यांच्या पंगतीला केदारेश्वर युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी चक्क शेकडोहून अधिक ग्रामस्थांसह भाविक-भक्त, वारकऱ्यांना गोडधोड भोपळवडे तसेच गुळवण्याच्या जेवणाची मेजवानी दिली.
सध्या तालुक्यात ठीक ठिकाणच्या गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले असून आंबाडे येथील ५६ वा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचा प्रारंभ सोमवार दि. १८ झाला. सप्ताह सात दिवस चालणार असून दररोज हरिजागर ,ज्ञानेश्वरी पारायण,प्रवचन ,कीर्तन असे सांप्रदायिक कार्यक्रम पार पडत आहेत.बारीबारीने गावातील आळीकरांकडून वारकरी तसेच ग्रामस्थांना सात दिवस जेवण देण्यात येते.यात अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी केदारेश्वर युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संघटित होऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वारकरी,ग्रामस्थ व भाविक भक्तांना भोपळवडे,गुळवणी असे गोड मेजवानी दिली.जेवण बनवण्यासाठी महिलांचा मोठा सहभाग होता.उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.