सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे पोलिस ठाणेंतर्गत प्रत्येक समाजाने सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन सुपे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक नागनाथ पाटील यांनी केले आहे.
सुपे पोलिस स्टेशनमध्ये शांतता कमेटीची मिटिंग घेण्यात आली. यावेळी पाटील बोलत होते. तत्पुर्वी सुप्यातील मुख्य पेठेतुन अधिकारी व पोलिसांच्यावतीने शांतता राखण्यासाठी रुट मार्च घेण्यात आला.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या अनुशंगाने सर्वच समाजांनी सामाजिक सलोखा राखला पाहिजे. त्यामध्ये कुठलीही तेढ निर्माण होवु नये. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी असे पाटिल यांनी सांगितले.
याप्रसंगी सुप्याचे सरपंच तुषार हिरवे, तालुका दुध संघाचे संचालक सुशांत जगताप, माजी सभापती शौकत कोतवाल, वढाणे सरपंच सुनिल चौधरी, समता परिषदचे जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत, अनिल हिरवे, उपसरपंच दत्तात्रय वाबळे, गणेश खैरे, गायकवाड तसेच काऱ्हाटी, मोरगाव आदीसह परिसरातील गावांतील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते. .....................................