वेल्हे ! मीनल कांबळे ! मनसेच्या इशाऱ्यानंतर पाबे ते पुणे (पाबे घाट) रस्त्याचे डागडुजीचे काम सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे ; मिनल कांबळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर खड्डेमय झालेल्या *पाबे ते पुणे (पाबे घाट) रस्त्याच्या डागडुजीचे काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हाती घेतले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना व नागरिकांना मनस्ताप व अपघातांना सामोरे जावे लागत होते. 
"या रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत तक्रार आणि दुरुस्तीसाठी नागरिक मागणी करत होते पण त्याची दखल वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी घेतली नाही. या रस्त्यावरील खड्ड्याबाबत जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता येथील रस्ते ताबडतोब दुरुस्त करा अशी मागणी करण्यात आली होती  मनसेच्या आंदोलन आणि रस्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली याबाबत नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार व्यक्त केले आहेत. 
To Top