सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वेल्हे; मिनल कांबळे
तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगले दिवस आले असून येथील युवकांचा कल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळला आहे नुकतेच वेल्हे गणाच्या अध्यक्षपदी आकाश खोपडे यांची निवड झाली आहे, वेल्हे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यामध्ये विभागणी झाल्यानंतर युवकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, तालुक्यात राष्ट्रवादीचे अगोदरच चार गट होते त्यामध्ये भर म्हणून नव्याने दोन गट निर्माण झाले आहेत तसेच शिवसेना केवळ मर्यादीत असल्याने यामध्ये देखील दोन गट पडले आहेत काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी मुळे योग वर्ग नाराज असल्याचे चित्र दिसत आहे या सर्वांचा परिणाम म्हणून युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आपला मोर्चा वळविला आहे याचा परिणाम म्हणून 18 गाव मावळ परिसरातील युवकांनी जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे, या परिसरातील आकाश खोपडे यास वेल्हे गणाची जबाबदारी देऊन अध्यक्ष पद देण्यात आले आहे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या हस्ते आकाश खोपडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी
तालुका अध्यक्ष दिगंबर चोरगे, रवींद्र घाडगे अंकुश दसवडकर संदीप दिघे,ज्ञानेश्वर भुरुक दत्ता शेंडकर विकास भिकुले सुनील रेणुसे विनायक लिम्हन, अमोल गायकवाड, चंद्रकांत चव्हाण,धनंजय रेणुसे, राजू झांजे, अमित दसवडकर,उपसरपंच दत्ता कदम आधीसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते
COMMENTS