सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे ऊस तोडणी मजुरांच्या मुलांची कोपी वरची शाळा चालते... सोमेश्वर कारखान्याच्या सहकार्याने येथील भारत ज्ञान विज्ञान समुदायाचे संतोष शेंडकर व सहकारी तसेच सोमेश्वर पत्रकार ग्रुप यांच्या कल्पनेतून येथे नियमित विविध उपक्रम राबवले जातात.
शनिवारी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे दत्ता माळशीकारे, ॲड गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर , महेश जगताप, हेमंत गडकरी, युवराज खोमणे, सुनील जाधव उपस्थित होते. समीर बनकर यांनी या मुलांना शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप करून पत्रकार दिन साजरा केला . साखर शाळेतील मुलांनी ज्येष्ठ कादंबरीकार सुशील धसकटे यांचे सह पत्रकारांना उसाच्या मोळ्या दिल्या. यावेळी प्रा . डॉ.अजय दरेकर, लेखक किरण बोधे,पत्रकार चिंतामणी क्षीरसागर, हेमंत गडकरी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सुशील धसकटे यांनी मुलांना कोणत्याही परिस्थितीत शाळा सोडू नका, शिकाल तरच ती टिकाल असे सांगत पुस्तके देण्याचे आश्वासन दिले. स्वागत साखर शाळेचे शिक्षक नौशाद बागवान व शिक्षीकांनी केले. प्रास्ताविक संतोष शेंडकर यांनी केले आभार गणेश आळंदीकर यानी मानले. शिक्षक संतोष होणमाने, आरती गवळी, अनिता ओव्हाळ, संतोष ठोकळे, संभाजी खोमणे, अश्विनी लोखंडे यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
COMMENTS