सोमेश्वर रिपोर्टर टीम----
फलटण ! प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना आरोपी हर्षद पप्पु रणदीवे वय २० वर्ष रा. चौधरवाडी ता. फलटण जि. सातारा याने दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी पिडीत हीस गोड बोलून तिचे डाव्या हाताला धरुन आरोपीने स्वतःचे घरात घेवुन जावुन तिला गोड बोलुन जमीनीवर झोपवले व तिचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी त्याला चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली आहे.
यावेळी पिडीतेस त्रास होवु लागला व त्यावेळी आरोपीने तु जर का कोणाला काही सांगीतलेस तर तुला मारून टाकेन असे म्हणुन पिडीतेस दम दिला आहे. याबाबतची खबर फलटण शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. देसाई फलटण शहर पोलीस स्टेशन यांनी करुन न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते.
सदरचा खटला श्रीमती के. व्ही. बोरा सो विषेश, जिल्हा सत्र न्यायाधीश सो सातारा यांचे कोर्टात चालला होता. सरकारतर्फे मंजुषा तळवलकर सहा. सरकारी वकील सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. नमुद केसमध्ये एकुण ०५ साक्षीदार तपासले, केवळ परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्याबाबत न्यायालयात समोर आलेला पुरावा व सरकारी वकील यांचेकडील पुरावे ग्राह्य मानून विषेश सत्र न्यायाधीश यांनी दि. ०६ जानेवारी २०२४ रोजी यातील आरोपीस बालकाचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ७,८ अन्वये ४ वर्ष सश्रम कारावास व रु.१०००/- दंड, दंड न दिलेस १५ दिवस साधी कैद. व भा.द.स.क. - ५०६ अन्वये ६ महीने सश्श्रम कारावास अशी शिक्षा दिली आहे.
उप-विभागिय पोलीस अधिकारी राहूल धस फलटण विभाग फलटण, सुनिल शेळके पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन पो.कॉ. अमोल घोरपडे ब.नं. २१०२ नेमणुक फलटण शहर पोलीस ठाणे यांनी कामकाज पाहिले, याकामी पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलीस उप-निरीक्षक उदय दळवी, सुनिल सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. फौजदार शशिकांत गोळे, पोलीस अंमलदार पो. हवा. १६८४ श्री. गजानन फरांदे, पो.हवा. १९७ मंजूर मणेर, म. पो. हवा १६४४ शेख, पो.कॉ राजेंद्र कुंभार २३९६, पो.कॉ अमित भरते ३८६ यांनी योग्य ती मदत केली.