Bhor News ! महावितरणच्या ट्रान्सफार्मर मधून ठिणगी पडली...आणि ऐन दुष्काळात हजारो पेंड्या जनावरांचा चारा जळून खाक झाला : बाजारवाडी-हातनोशितील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
महावितरण कंपनीच्या रोहित्राच्या वीज शॉर्टसर्किट मुळे जनावरांचा चारा जळून खाक झाल्याची घटना बाजारवाडी - हातनोशी  ता. भोर  येथे दोन्ही गावच्या वेशीच्या हद्दीवर घडली असून शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
         मिळालेली माहितीवरून बाजारवाडी - हातनोशी (ता. भोर ) येथे दोन्ही गावच्या वेशीच्या हद्दीवर महावितरण कंपनीचा  रोहित्र असून वीज शॉर्टसर्किटची ठेंणगी गवतावर पडून जनावरांसाठी काढून ठेवलेला चारा जळून खाक झालेला आहे .त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वीसगाव खोऱ्यातील शेतकरी संघटनांच्या वतीने  बाळासाहेब भिलारे यांनी केलेली आहे.यामध्ये शेतकरी पांडुरंग सदाशिव खोपडे  ४ हजार गवताचे पेंड्या ,तुकाराम काळुराम शिंदे यांचे २ हजार गवत , रामचंद्र भिलारे यांचे ३ हजार गवत व पाचशे भेळा , बाळासाहेब भिलारे यांचा सातसे भेळा अग्नीत जळून खाक झालेला आहे.रोहित्राच्या वीज शॉर्टसर्किटचा हा प्रकार दरवर्षी या ठिकाणी होत असतो. दुष्काळाच्या परिस्थितीत  जनावरांचा चारा जळून खाक झाले असल्यामुळे बाजारवाडी - हातनोशी येथील शेतकऱ्यांना गवत व  भेळा जनावरांच्या चारा प्रश्न उद्भवणार असल्याचे  बाळासाहेब भिलारे यांनी सांगितले.
To Top