सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात यंदा मागील वर्षाच्या तुलनेत पर्जन्यवृष्टी कमी झाली असल्याने नीरा-देवघर तसेच भाटघर धरण उशिरा भरले गेले आहे.सद्या शासनाने पूर्वेकडील भागतील तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याने निरा देवघर, भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु केला आहे.भविष्यात भोर तालुक्यातील धरणाच्या पाण्यावर असणारे पाणी पुरवठा योजनावर पाणी टंचाईचे संकट येणार असल्याने तात्काळ दोन्ही धरणांचा विसर्ग बंद करावा अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा आमदार संग्राम थोपटे यांनी जलसंपदा विभाग पुणे यांना निवेदन देऊन केला आहे.
आमदार थोपटे यांनी भोर येथील रायरेश्वर डोंगरी विकास परिषद कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शनिवार दि.१३ माहिती दिली.भोर तालुक्यात भाटघर व निरा-देवघर धरणे असून या धरणातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीमार्फत होत असते. परंतु सदरच्या कालवा सल्लागार समितीचे या वर्षीचे आवर्तन नियोजन पाहता दोन्ही धरणांची पाणी पातळी मागील वर्षाच्या तुलनेत २० टक्क्यांहून कमी असल्याने धरणांचे पाणी साठे झपाट्याने कमी झाले आहेत. धरणांच्या पाण्याच्या विसर्गाची परिस्थिती अशीच सातत्याने राहिली तर पूर्व - पश्चिम भागातील गावांना दोन्ही धरणांच्या पाणी पुरवठयाच्या योजनांना भविष्यात काही महिन्यांमध्ये पाणी उपलब्धततेच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच शेतीची आवर्तने देखिल दोन्ही धरणांच्या आवर्तनावर अवलंबून आहेत.त्याचप्रमाणे दुष्काळाच्या यादीमध्ये भोर तालुक्यातील वेळू ,संगमनेर व भोर या तीन मंडळांपैकी संगमनेर व भोर मंडळामधील निरा-देवघर आणि भाटघर धरण भागातील अनेक गावांना सामोरे जावे लागणार आहे. लवकरात लवकर दोन्ही धरणातील आवर्तनाव्दारे जादा प्रमाणात सोडण्यात येणारे पाणी तातडीने बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे आमदार थोपटे म्हणाले.