Bhor Breaking ! कापूरव्होळ-भोर रस्त्यावर डंपरच्या टायर खाली चिरडून महिलेचा मृत्यू : खंडोबाचा माळ येथील घटना

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणेहून भोरमार्गे महाडला दुचाकीवरून जाताना कापूरव्होळ मार्गावरील संगमनेर जवळील खंडोबा माळ ता.भोर उताराला रस्त्याच्या खड्यांवरून दुचाकी घसरून महिला रस्त्यावर कोसळली.याच मार्गावरून पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरच्या टायर खाली महिलेचे डोके सापडल्याने महिला जागी चिरडून मृत्यू पावल्याची घटना सोमवार दि.१५ घडली.
        सद्या कापूरहोळ -भोर -मांढरदेवी रस्त्याचे काम वेगाने सुरू असल्याने रस्त्यावर दगड - माती आलेली आहे.या दगड मातीवरून दुचाकी वाहन चालक घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान रस्त्याच्या कामावरील डंपर सुसाट वेगाने चालवले जातात. याचा नाहक त्रास दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना होत असतानाच सोमवार दि.१५ पुणेवरुन भोरमार्गे महाडला दुचाकीवरून मुलगा व  आई जात असताना खंडोबाच्या माळाच्या उताराला खाड्यावरून दुचाकी घसरून दुचाकी वर मागे बसलेली महिला रस्त्यावर कोसळली याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव डंपरच्या टायर खाली या महिलेचे डोके गेल्याने महिलेचा जागेवर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.चालक पळून गेला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
To Top