सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली धनंजय गोरे
सातारा जिल्ह्यातील वाहनाची टोल माफी झालीच पाहिजे यासाठी पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्या वतीने टाेल नाक्यावर आज शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जोरदार रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले, यावेळी तब्ब्ल एक तास रस्ता रोको केल्याने टाेल नाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर सातारा जिल्ह्यातील नागरिकांना टोल माफी मिळावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने रास्ता राेकाे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला हाेता. त्यानूसार शिवसैनिक सकाळपासून आनेवाडी टाेल नाक्यावर जमा झाले होते.
शिवसैनिकांनी रास्ता राेकाे केल्यामुळे पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या. यावेऴी जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो शिवसैनिक भर उन्हात रस्त्तावर उतरले होते,आंदाेलकांनी अन्यायकारक अशी होणारी टाेल माफी मिळालीच पाहिजे अशी जाेरदार घाेषणाबाजी यावेळी शिवसैनिक करत होते.सातारा पाेलिस दलाने आंदाेलकांची भेट घेत चर्चेने मागणीवर मार्ग काढू असे सूचविताच आंदाेलकांनी त्यास नकार देत महामार्गावरच ठिय्या मांडला होता,आनेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापकीय अधिकारी अमित भाटिया, संकेत गांधी, रघु्वीर सिह,यांच्यासह आंदोलन करते रस्त्यावर समोरा समोर बसले होते, यावेळी वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम, भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनी रमेश गर्जे, भुईंज महामार्ग केंद्रचे सपोनी गालिंदे यांनी समेट घडवून आणताना जिल्हावासियांना मोफत टोल संबधी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वासन घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले,
यावेळी जिल्हा प्रमुख सचिन मोहिते,जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, सुधीर राऊत, युवा सेना जिल्हा प्रमुख माऊली पिसाळ, अजित यादव, विश्वनाथ धनावडे, नामदेव बांदल,नितीन गोळे, सागर रायते, सचिन झांजूर्णे, विकास नाळे, श्रीकांत पवार, गणेश जाधव, शिवराज टोणपे, बापू गाढवे,रुपेश वंजारी, हरी पवार , इम्रान बागवान,अनिल गुजर, रिजाज शेख, सादिक बागवान, सागर धोत्रे ,तेजस पिसाळ ,विलास भणगे, संदीप साबळे,सागर कदम,प्रणव सावंत, अतीस ननावरे,रवी भणगे, निलेश चव्हाण, आकाश पवार याच्यासह शिवसैनिक उपस्थित होते, याप्रसंगी भुईंज पोलीस रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
टोल मुक्ती साठी शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
सातारा जिल्हावासियांना टोल माफी झाली पाहिजे या मागणीवर शिवसैनिक ठाम
सोमेश्वर रिपोर्टर टिम
जावली प्रतिनिधी (धनंजय गोरे)

COMMENTS