सोमेश्वर रिपोर्टर टीम----
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील निरा येथील एका खाजगी क्लास मध्ये शिकत असलेल्या बारावीत शिकणाऱ्या एक अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच एका शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सुनील विश्वनाथ चव्हाण सद्या राहणार निरा ता. पुरंदर जी. पुणे मूळ गाव खोजेवाडी ता. जी. सातारा याच्यावर जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटनेने निरा परिसरात खळबळ उडाली आहे. हा शिक्षक कंत्राटी पद्धतीने विद्यार्थिनींना शिकवण्याचे क्लास घेत होते. शाळा सुटल्यानंतर खाजगी क्लास सुद्धा घेत होते. या शिक्षका विरोधात विद्यार्थिनीने तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक झाली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशन करीत आहे.