सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
हिंदू शेगर समाज विकास मंच, महाराष्ट्र राज्य आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन वधू वर परिचय मेळावा नुकताच यशस्वीरित्या संपन्न झाला.
या ऑनलाईन मेळाव्याचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी फोन वरून शुभेच्छा देऊन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदू शेगर - धनगर समाजसेवा महासंघ माजी अध्यक्ष ॲड.गुलाब गावडे होते, आधुनिक काळाची गरज ओळखून घर बसल्या महाराष्ट्रातील समाजापर्यंत पोहोचण्यासाठी उत्कृष्ठ मार्ग निवडला आहे व आपले कार्य असेच चालू ठेवावे असे मनोगत व्यक्त केले. या ऑनलाईन मेळाव्यासाठी.सुनील भगत,.प्रताप पाटील, सुनीता गावडे, शिवलाल गावडे,.अप्पासाहेब रांधवण व इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
समाजातील अनेक लोकांना वाटते की ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनीच परिचय मेळाव्याला सहभागी व्हावे, पण असं काही नाही वधू वर परिचय मेळावा ही आजच्या बदलत्या काळाची गरज आहे, समाजाची शैक्षणिक व सामाजिक प्रगती होत असली तरी सामाजिक स्नेहभाव कमी होत चालला आहे अशा वेळी सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून हिंदू शेगर समाज विकास मंचने ऑनलाईन पद्धतीने मोफत वधुवर परिचय मेळावा सर्वांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
या विकासमंचचे खरे काम कोरोना काळापासून व्हॉट्सॲप ग्रूपव्दारे चालू झाले, आणि त्याचे रूपांतर ऑनलाईन मेळाव्यात झाले, पहिल्या मेळाव्यात जवळपास 150 वधु वर सामील झाले होते तसेच दुसऱ्या मेळाव्यामध्ये जवळपास 250 वधु वर सामील झाले होते तर या वर्षीच्या मेळाव्यामध्ये जवळपास 300 वधु वरांनी सहभाग घेतला. आज पर्यंत या संस्थेच्या मार्फत जवळपास 150 हून जास्त विवाह जुळून आलेली आहेत.
या मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यातून व परदेशातून वधू वर ऑनलाईन सहभागी झाले होते.
आधुनिक तंत्रज्ञान वापरून ऑनलाईन पद्धतीने वधुवर परिचय मेळावा झूम ॲपवर घेण्यात आला,आजच्या धावपळीच्या युगात वेळ व पैशाची बचत होऊन घरबसल्या अनेक स्थळांची माहिती समाजाला मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदू शेगर समाज विकास मंच अध्यक्ष श्री. रामदास येडेपाटील यांनी केले, वधू वर बायोडाटा वाचन संघटनेचे सचिव, प्रा.अजय गाढवे व कार्याध्यक्ष, प्रा.संभाजी साबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन सहसचिव .सतिश शिंगाडे व आभार उपाध्यक्ष,.रामदास बीबे यांनी मानले.
COMMENTS