सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
नाचणीचे गाव म्हणून उदयास आलेल्या श्री क्षेत्र कुसुंबी येथिल श्री काळेश्वरी देवी, वाखणची काळुबाई आणि मांढरची काळुबाई या देवंतांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमास आज ( दि. १८ ) पासुन सुरुवात होत असुन दि २२ पर्यत हा सोहळा चालणार असल्याची माहिती श्री काळेश्वरी देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रामदास वेंदे यांनी दिली.
गत एक महिना श्री काळेश्वरी देवीच्या वज्रलेप सोहळा सुरु असल्याने भाविकांना दर्शन बंद करण्यात आले होते परंतु दि. १८ ते २२ पर्यत होणाऱ्या सोहळ्या नंतर दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
आज (दि.१८ ) स. ८ ते दु ३ पर्यत उदक शांती प्राणप्रतिष्ठा विधीस आरंभ, मुर्तीस स्नान, ४ ते ७ गावातुन देवीची पालखीतुन मिरवणूक, रात्री ९ वा. हभप सावता महाराज फुले इंदापूरकर यांचे भारूड,
दि.१९ रोजी स. ९ ते १ वा. प्रायचित्त गोपूजन, विविध देवता पुजन, यज्ञ मंडप प्रवेश पुजन, मुर्तीस पंचामृत स्नान, सायं पुजन व महाआरती रात्री ९ वा शिव चरित्र व्याख्याते सुरेंद्र शिंदे वाघेली याचे व्याख्यान , तसेच दि. २० रोजी स. ९ ते १ अग्नीपुजन , मुर्तीस पुष्पधिवास, अन्नधिवास, महाआरती, रात्री ९ वा रामानाचार्य हभप महादेव महाराज रसाळ यांचे किर्तन होणार आहे.
दि. २१ रोजी स. ७ वा. वेण्णा नदीतुन १०० जलकुंभ भरून आणणे, ९ ते १ वा. १०० कलशांचे जल कुंभ स्नान, दु . १ ते ६ वा. यज्ञ हवन, स्थापना विधी, नेत्रोनमिलन, द्रव्यधिवास, शय्याधिवास, स्त्रोत्र पठण करून भंडारा अपर्ण करणे, शिखरावर १०० कलश जल स्नान करणे , सायं. ७ ते ८.३० वा महाप्रसाद आणि ९ वा. जयभवानी गोंधळ पार्टी आबापूरी यांचा कार्यक्रम होणार असून दि. २२ रोजी स. ७ ते ११ वा आईची जागृत अवस्था मंगलस्नान, महाआरती, ११ ते १ परमपुज्य श्री ष. ब्र. प्र. १०८ श्री गुरु महादय्या रविशंकर शिवाचार्य महाराज रायपाटणकर यांच्या हस्ते तर वेदमुर्ती महेश गोविंद पाठक यांचे मार्ग दर्शनाखाली श्री काळेश्वरी देवीची स्थापना होणार आहे.
या कार्यक्रमासाठी श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आ. श्री. सदाशिवभाऊ सपकाळ, माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती अमितदादा कदम, जिल्हा बॅक संचालक ज्ञानदेव रांजणे, स्वराज पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश (बाबा) कदम आदी मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहीती ग्रामस्थ व विश्वस्त यांनी दिली आहे.
COMMENTS