सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात मागील चार दिवसांपासून सकाळ ,सायंकाळ ढगाळ वातावरण तयार होत होते.सोमवार दि.८ सायंकाळपासून कोणत्याही क्षणी पाऊस बरसण्याची चिन्हे होती.तालुक्यात मंगळवार पहाटेपासून अवकाळी पावसाचा सिडकाव सुरू झाला असून रब्बी पिकांना चांगलाच दिलासा मिळाला.दरम्यान पुढील काळात रब्बी पिके जोमात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाले आहेत.
तालुक्यात रब्बी पिकांच्या पेरणी नंतर आठ दिवसांनी दोन वेळा अवकाळी पाऊस बरसला होता. त्यानंतर पूर्णता एक महिना पिके पाण्याविना होती. पिकांना सद्या पाण्याची गरज असतानाच अवकाळी पावसाचा सिडकाव सुरू असल्याने पिके जोमात येण्याचे चित्र आहे. तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांची माळरानावरील रब्बी पिके पाण्याअभावी चला सूकून चालली असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.मात्र सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार असून पिके येथील असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
------------------------------
पिके रोगमुक्त होणार------
मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात ढगाळ हवामान तसेच सकाळी दुखे पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे रब्बीतील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत होता.मंगळवार दि.९ पहाटेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाच्या सिडकावामुळे पिकांवर पडलेला चिकाटा तसेच इतर रोग कमी होणार आहेत.परिणामी पिके रोगमुक्त होणार आहेत असे वरवडी ता.भोर येथील शेतकरी दिलीप वरे यांनी सांगितले.