सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी पंचायत समितीच्या अनेक विभागांना जागा अपुरी पडत असल्याने ते विभाग जुन्या इमारतीत सुरु आहेत. त्यामुळे नविन विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार केला असून विस्तारीकरणास मान्यता मिळाल्यास त्यामध्ये पत्रकारासाठी पत्रकार भवन देण्याचा विचार असल्याचे सांगुन मी तसा प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन उपस्थित पत्रकारांना दिले.
जावली तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचे उप उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी कोणताही मणुष्य काम करताना चुकत असतो तो परिपूर्ण नसतो त्यामुळे आम्हीही काम करित असताना चुका होणार परंतु त्या चुका आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात असे सांगत असताना पुढे म्हणाले काम करणाराची वृत्ती आणि निष्ठा चांगली असेल तर काम करताना चुका होणार नाहीत असेही सांगीतले.
याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनीही बोलताना जसे पत्रकारांच्या कामकाजात बदल झाला आहे तसाच आमच्या कामकाजात बदल झाला आहे. आता आम्हाला रस्त्यात दगड जरी पडला किंवा काही प्राणी मेलेला असला तरी कॉल येत असतो परंतु तालुक्यात काम करीत असताना कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे कामाचा ताण वाढत असतो. पुढे म्हणाले पत्रकारांनी प्रशासनाला चुका दाखविण्याचे काम करावे आणि समाजासाठी पत्रकार व पोलीस यांनी हातात हात घालुन काम करावे असे आवाहन संतोष तासगावकर यांनी केले.
यावेळी वर्षाचे तिनशे पासष्ठ दिवस समाजासाठी काम करणारा पत्रकार दिन सर्वांना विस्मरण होतो याबाबत माजी अध्यक्ष शशिकांत गुरव यांनी खेद व्यक्त केला तर जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी प्रशासनाला निर्णय बदलायला लावण्याची ताकद पत्रकारांच्यात आहे. भणंग येथिल कमानीवर मंजुर करण्यात आलेल्या निर्णयावर आणि मेरुलिंग येथिल वरून पाणी वाटपावर पत्रकारांनी आवाज उठविल्यावर प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली. कमानीवरील निधी बंद करण्यात आला तर वरून पाणी देण्याची पद्धत बंद करण्यात आली एवढी ताकद पत्रकारांच्या लेखनीत आहे त्यामुळे पत्रकारांनी आपल्या लेखनीची ताकद दाखविण्याची गरज असल्याचे आवाहन जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी केले.
जावली तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचे उप उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.
दर्पनकार बाळशास्री जांभेकर यांनी सुरु केलेल्या "दर्पन " वृत्तपत्राची सुरुवात दि. ६ जानेवारी रोजी झाली होती. त्यामुळे हा दिवस पत्रकार दिन म्हणून पाळला जातो . परंतु दि. ६ जानेवारी रोजी प्रशासनाला शासकिय सुट्टी असल्याने प्रशासकिय अधिकार्यांनी शासकिय कामकामाच्या दिवशी पत्रकारांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला. यावेळी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत गुजर यांनी आभार मानले.
COMMENTS