सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भुईंज : प्रतिनिधी
विनापरवाना साग लाकूडमालाची वाहतूक करणाऱ्यावर वाई वनविभागाने कारवाई केली या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की दि. 07 रोजी मिळालेल्या माहितीवरुन मौजे भुईंज पैकी धनगरवाडी गावच्या हद्दीत फिरती तपासणी करीत असता आरोपी अतुल विजय राऊत रा. वडूज ता.खटाव जि.सातारा हे महिंद्रा कंपनीची MH-11 AG 3414 या क्रमांकाच्या पिक-अप मधून साग प्रजातीचा अनगड लाकुडमाल ३.०६८६ घ.मी. विनापास, विनापरवाना वाहतूक करण्याच्या तयारीत असताना पकडला. त्यानुसार विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 41(2) ब चे उल्लंघन झालेने वनरक्षक भुईंज (अतिरिक्त) यांनी विनापरवाना वाहतुकीचा वन गुन्हा नोंद केला आहे. सदर कारवाई मध्ये सुमारे चार लाख दहा हजार सहाशे सतरा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा श्रीमती. आदिती भारव्दाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वाई श्रीमती. स्नेहल मगर, वनपाल भुईंज डी. एन. व्हनमाने, वनपाल वाई एस. आर. मोरे, वनरक्षक भुईंज (अतिरिक्त) व्ही एम चौरे यांनी सदरची कारवाई पार पाडली.
COMMENTS