सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ व सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय, सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि ३ ते ५ या कालावधीत डॉ बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न झाली.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. शिवाजी पाचारणे यांनी गुंफले. विनोदातून व्यक्तिमत्व विकास' या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले, व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. प्रदीपकुमार शहा यांनी गुंफले. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता शाप कि वरदान' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प डॉ. बजरंग कोरडे यांनी गुंफले. त्यांनी इंग्रजीचा अचूक वापर' या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी. सूर्यवंशी होते व उपप्राचार्य प्रा.डी.व्ही.बनसोडे हेही उपस्थित होते. केंद्र कार्यवाह प्रा. माधुरी भांडवलकर यांनी कार्यक्रम संयोजकांची भूमिका बजावली. प्रा. प्राजक्ता अडसूळ यांनी सूत्र संचालन केले. व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयातील सदर कार्यक्रमास विद्यार्थी १२५ विद्यार्थी उपस्थित होते.
या व्याख्यानमालेसाठी श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, तसेच संचालक प्रतिनीधी आनंदकुमार होळकर, संस्थेचे सचिव भारत खोमणे यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.