सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबर २०२३ मधील विषय नंबर १ ते ११ बाबत विचार विनिमय चर्चा न करता मंजूर केले. तसेच नफा तोटा पत्रक पान क्र. ४० मधील खर्च मुद्दा क्र. १०, १२ चुकीचा खर्च तसेच पान क्र. १४ मधील मुद्दा क्र. ६ व मधील बीगर सभासद यांना ऊसदराची दिलेली जादा रक्कम यामुळे शेतकरी सभासदांना कमी मिळालेला ऊसदराचा फरक फेर ऑडीट करून मिळवून द्यावा अशा तीन मागण्या पुरंदर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी पुणेचे प्रादेशिक सह संचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांचेकडे केल्या होत्या.
दिलीप गिरमे यांनी प्रादेशिक सह संचालकांना दिलेल्या पत्रावर कार्यालयाने खुलासा केला आहे की, सदर पत्रामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मर्या. सोमेश्वरनगर ता. बारामती जि. पुणे वार्षिक सर्वसाधारण सभा सन २०२२-२३ तारीख २९/०९/२०२३ मधील विषय नंबर १ ते ११ बाबत विचार विनिमय चर्चा न करता मंजूर केलेले विषयी तक्रार आणि हरकत असलेबाबत आणि नफा तोटा पत्रक पान क्र. ४० मधील खर्च मुद्दा क्र. १०, १२ चुकीचा खर्च तसेच पान क्र. १४ मधील मुद्दा क्र. ६ व मधील बिगर सभासद यांना ऊस दराची दिलेली जादा रक्कम यामुळे शेतकरी सभासदांना कमी मिळालेला ऊसदराचा फरक फेरऑडीट करून मिळवून देणेबाबत विनंती केलेली आहे. संदर्भीय पत्राची प्रत सहपत्रित करण्यात आलेली आहे.
सदर पत्रामध्ये अर्जदार यांनी नमूद केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट वस्तुनिष्ठ अहवाल या कार्यालयास सादर करावा. असे आदेश प्रादेशिक सह संचालकांनी दिले आहेत.
COMMENTS