सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर कारखान्याच्या साखर दुकान समोरील रस्त्यावर एकाचा अपघाती मृत्यू झाला आहे.
मंगेश प्रल्हाद माघाडे वय ३५ रा. मोराळवाडी ता. बारामती असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे. मात्र अपघात नेमका कसा झाला हे अजून समजले नाही. करंजेपुल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज तपासणे चालू आहे. पुढील तपास चालू आहे.