सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर (निंबुत) येथील रवींद्र दत्तात्रय गिरी हा दोन्ही पायाने अपंग निरा बारामती रस्त्यावर गेल्या २० वर्षांपासून अक्षय गार्डन समोर छोटीशी टपरी टाकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
मात्र कोरोना आला आणि त्याच्या व्यवसायाला सारख्या उध्वस्त करून गेला. आज गोसावी समजतील बांधवानी त्याचा दुकानात साहित्य भरून त्याला जगण्याचं बळ दिलं.
अपंग असूनही रवीची जगण्याची धडपड करत असते. घरातील कर्ता पुरूष वयस्कर आई ती देखील खूप आजारी असते. वयस्कर आजी, नियती देखील संपूर्ण घराची जबाबदारी या दिव्यांग रवीवर तर वडील कॅन्सर सारख्या दुर्दैवी आजाराने वीस वर्षांपूर्वीच वारले आहेत. करोना काळाच्या अगोदर याचे सर्व कसे व्यवस्थित चाललं होतं. नुकताच दुकानात स्थानिक पतसंस्थेकडून सुमारे दोन ते अडीच लाख रुपये कर्ज घेऊन माल भरला होता. सारे काही सुरळीत चालू असताना करोना सारखी महामारी आली अन् याच सर्व उध्वस्त करून गेली. दुकानात भरलेला माल सलग दोन वर्ष दुकान बंद असल्यामुळे तसाच पडून एक्सपायर झाला. अक्षरशा तो फेकून देण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच उरला नाही. याच दुकान मात्र पूर्णपणे उघड्यावर पडलं दुकानात विकण्यासाठी कसलाही माल उरला नाही. स्थानिक पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज दिवसान दिवस थकत गेलं स्थानिक पतसंस्थेचे वसुली अधिकारी येऊन पैसे भरण्यासाठी तकदा लावू लागले. त्यातच करोना काळात स्थानिक मित्रांनी खाण्यासाठी व दवाखान्यासाठी हात उसने खूप आर्थिक मदत केली होती. ते देखील सध्याच्या काळात रोज त्याच्याकडे पैसे देण्यासाठी तगदा लावत होते.
रवीने ही व्यथा आपल्याच समाजातील बांधवांपुढे मांडली. मला यातून बाहेर काढा. म्हणून त्याने एक आव्हानात्मक निवेदन अनुप गोसावी नाशिक यांना पाठवलं. त्यानंतर त्यांनी ते निवेदन गोसावी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते. दशरथ गोसावी यांना पाठवलं. त्यानंतर दशरथ गोसावी यांनी महाराष्ट्रातील तमाम गोसावी बांधवांना निश्चलपुरी प्रतिष्ठान वरून विनम्र आव्हान केलं. की आपल्या समाजातील रवींद्र दत्तात्रेय गिरी हा मरणाच्या दारात आहे खूप आर्थिक अडचणीत खचून गेला आहे .त्याचे जीवन पूर्ववत आणण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची खूप गरज आहे. तेव्हा समाज बांधवांनो जास्तीत जास्त मदत करून आपल्या या बांधवाला यातून बाहेर काढूया समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवूया.
त्यानंतर ही माहिती बदलापूरचे. संदीप गिरी यांना गेली त्यांनीही त्यांच्या संपर्कातील सर्व गोसावी समाजाला विनम्र आवाहन केल. संदीप गिरी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. आज दि. १० रोजी समाजातील सर्वांनी येऊन त्याच्या दुकानात भरगच्च माल भरून भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.
यावेळी दशनाम गोसावी समाजाचे दशरथ गोसावी. महेंद्र गोसावी. नवनाथ भारती. संतोष भारती. किशोर गोसावी. आबासाहेब गोसावी. अनिल गोसावी व आप्पासाहेब गिरी. हे मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS