सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना राज्यस्तरीय कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील २५० कार्यकारी संचालकांच्यातून या पुरस्कारासाठी यादव यांची निवड करण्यात आली आहे.
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट हे दरवर्षी राज्यातील कारखान्यामधून उत्कृष्ठ कार्यकारी संचालक म्हणून निवड करते. यावेळी या पुरस्कारासाठी राजेंद्र यादव यांनी निवड करण्यात आली आहे. राज्यभरातून २५० कारखान्यांच्या कार्यकारी संचालक यांची माहिती मागवून त्यामधून निवड कमितीद्वारे या पुरस्काराची निवड करण्यात आली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेत दि. ११ जानेवारीला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यादव यांनी
एमएससी ऍग्री पदवीनंतर १९८९ ला दत्त शिरोळ कारखान्यात ऊस विकास अधिकारी म्हणून काम पाहिले. १९९२ ला ते सोमेश्वर कारखान्यावर ऊस विकास अधिकारी म्हणून काम सुरू केले. १९९२ ते १९९९ दरम्यान त्यांनी छत्रपती कारखान्यावर ऊस विकास अधिकारी म्हणून काम पाहिले. २००३ साली ते कार्यकारी संचालक मंडळाच्या पॅनलवर आल्यावर २००४ ला ते कार्यकारी संचालक म्हणून रयत सहकारी साखर कारखान्यावर काम पाहिले. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांनी पाहिले. २००८ ते २०१० या कालावधीत त्यांनी छत्रपती कारखान्यावर काम पाहिले, तसेच २०११ ते २०१७ पर्यंत त्यांनी अकलूज येथील सहकार महर्षीचे काम पाहिल्यावर २०१७ पासून आतापर्यंत ते सोमेश्वर कारखान्यावर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत.