सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील पिंपरी येथे पुणे पंढरपूर पालखी महामार्ग लगत असणाऱ्या आपल्या पपईच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक विजय थोपटे यांना आपल्या पपईच्या क्षेत्रात काही चोरटे पपई चोरून नेताना दिसले.
त्यांनी चोरट्यांना हटकले असता उलट या चोरट्यांनी त्यांना शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांच्या पाठीवर मानेवर व डोक्यावर जोराचा फटका मारला. त्यांचा आवाज ऐकून लपून बसलेले आणखी दोन-तीन चोर त्यांच्या अंगावर धावून आले. व पुन्हा शिवीगाळ करून पळून गेले डोक्याला व मानेला जबर मुका मार लागल्यामुळे त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचार करून त्यांना सोडले.
दवाखान्यातून सोडल्यानंतर निरा पोलीस स्टेशनला त्यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. अधिकचा तपास निरा पोलीस स्टेशन करीत आहे.
COMMENTS