सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
बारामती व पुरंदर तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार दि. ३ पासून नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवार कांदा मार्केट (लिलाव पद्धत ) चालू होणार आहे अशी माहिती सभापती शरद जगताप यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, व आमदार संजय जगताप यांच्या सूचनेनुसार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांच्यामधील झालेल्या बैठकीमध्ये येत्या शनिवारपासून निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये कांदा मार्केट चालू होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य उद्देशाप्रमाणे कांदा उत्पादक व व्यापारी यांच्या सोयीसाठी जवळील बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी हे कांदा मार्केट चालू होत आहे.
यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी तसेच व्यापारी यांना सर्व सुख सुविधा बाजार समितीच्या वतीने पुरविण्यात येतील. अशी माहिती उपसभापती महादेव टिळेकर यांनी दिली.
यावेळी उपस्थित नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देविदास कामठे, वामन कामठे, बाळासो जगदाळे, अशोक निगडे, पंकज निलाखे, संदीप फडतरे, शरयू वाबळे, शहाजान शेख, भाऊसाहेब गुळदगड, गणेश होले, बाळू शिंदे, सुशांत कांबळे, मनीषा नाझीरकर, अनिल माने, राजकुमार शहा, विक्रम दगडे, तसेच सचिव मिलिंद जगताप उपस्थित होते.
तरी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी नीरा मार्केट यार्ड येथे घेऊन यावा अशी विनंती सभापती यांनी केली आहे. तसेच कांदा मार्केट सुरळीत चालू झाल्यानंतर येत्या काही महिन्यांमध्ये नीरा मार्केट यार्ड मध्ये भुसार व भाजीपाला मार्केट ही चालू करणार आहोत असे मार्केट कमिटीच्या सर्व संचालकांनी 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
त्यावेळी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला संचालकासह सर्व संचालक सचिव तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
COMMENTS