सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील महाविद्यालय परीसरात बुलेट गाडीच्या सायलन्सर बसवून शायनिंग मारत कानठळ्या बसवणारा आवाज काढणाऱ्या सहा जणांवर करंजेपुल पोलिसांनी कारवाई करत प्रत्येकी सहा हजाराचा दंड करत गाडीला बसवलेले सायलन्सर काढून घेतले.
सोमेश्वरनगर परिसरात बुलेट गाड्यांना कंपनीचा असलेला सायलन्सर काढून त्याठिकाणी वेगळ्या कंपनीचा सायलन्सर बसून त्यामुळे ठो..फट असा आवाज काढून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या सहा जणांविरोधात आज पोलिसांनी कारवाई करत त्यांना प्रत्येकी सहा हजाराचा दंड करत गाडीला बसवलेले सायलन्सर काढून घेतले.
पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस हवालदार रमेश नागटिळक, पो. ह. अमोल भोसले, पोलिस कॉ. आबा जाधव, पो. को. नितीन साळवे यांनी ही कारवाई केली.