सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील नांगरेवाडी (खानापूर) येथे घराशेजारी शेतकरी सुनील दिनकर बांदल यांनी जनावरांच्या चाऱ्याचा(भात भेळा) साठा करून ठेवला होता.या चाऱ्याच्या गंजीला कोणीतरी अज्ञाताने आग लावून दिल्याची घटना घडली.यात तीनशे भात भेळा जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे हजारों रुपयांचे नुकसान झाले.
सध्या भोर तालुक्यातील शेतकरी लगबगीने गवत कापणी करीत असून शेतकरी गवताची तसेच भात भेळ्यांची घराशेजारील मोकळ्या जागेत साठवणूक करून ठेवत आहेत. या चाऱ्याचा शेतकरी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोग करीत असतात.सुनील बांदल या शेतकऱ्याने असाच जनावरांसाठी चारा साठवणूक करून ठेवला होता.या पाचशे चाऱ्याच्या ढीगाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्याची घटना घडली.गावातील प्रवीण नांगरे ,अजय धोत्रे, मनोज वाडकर ,राजू धोत्रे ,किरण नांगरे ,सुनील बांदल, अविनाश बांदल या तरुणांनी तात्काळ याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून आगीतून दोनशे चाऱ्याच्या पेंड्या वाचविल्या.
COMMENTS