सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
'मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण' मनामुळे आपले शरीर चांगले राहते. कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्याने सकारात्मक विचारांची कास धरली, तर आपल्यावर उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो असे प्रतिपादन , फलटण येथील मुधोजी हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. रवींद्र येवले यांनी केले.
सुपे (ता.बारामती) येथील जीवन साधना फाऊंडेशन संस्थेच्यावतीने प्राजक्ता विद्यालयाची प्रेरणा असलेल्या प्राजक्ता सुपेकर हिच्या १० व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या ''प्राजक्ता'' व्याख्यानमालेत ' मला आनंदाने जगायचंय ' या विषयावर पहिले पुष्प येवले यांनी गुंफले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्याचे सरपंच तुषार हिरवे होते.
येवले म्हणाले की प्रत्येक गोष्टीकडे सकारत्मक दृष्टीकोणातुन पाहिले पाहिजे. तसेच तरुणाईसमोर एक चांगला आदर्श ठेवा, परिस्थितीशी झगडा, आणि आपले मन खचू देवु नका. असे सांगताना येवले यांनी आ. प्रकाश आमटेंपासून ते अगदी संत चोखामेळा, संत तुकाराम महाराज आदींचे विचार मांडुन अनेक आध्यात्मीक तसेच विनोदी शैलीने आनंदाने जगण्याचा सोपा मार्ग सांगितला.
याप्रसंगी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण सकट, माजी ग्रा. पं. सदस्य मधुकर बोरकर, पोलिस पाटील गणेश चांदगुडे, राहुल बोरकर, गणेश लिपारे, शकील तांबोळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी हनुमंत चांदगुडे यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय व्यवस्थापक गणेश भुजबळ यांनी केला. तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे यांनी मानले.
---------------------------------------
COMMENTS