सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
बारामती येथे डायनॅमिक्स कंपनीत कामाला असलेल्या मुरूम ता. येथील इंद्रजित प्रकाश मोरे वय ३२ याचा बारामती येथे कल्याणी कॉर्नरवर संशयास्पद रित्या मृतदेह आढळून आला आहे. नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
सविस्तर हकीकत अशी की, मुरूम ता. बारामती येथील इंद्रजित मोरे हा युवक गेल्या अनेक वर्षांपासून कामानिमित्त बारामतीमधील तांबेनगर येथे आपल्या पत्नी व दोन मुलांसमवेत राहत होता. तो डायनॅमिक्स या कंपनीत कामाला होता. दि. ६ रोजी किराणा बाजार घरी पोहच करून मी मित्रांबरोबर बाहेर पूजा हॉटेलला जेवायला निघालो आहे असे आपल्या पत्नीला सांगून घरातून बाहेर पडला. सकाळी सात वाजता कल्याणी कॉर्नरला त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याची मोटारसायकल एम एच 42 बी एच, 8788 रस्त्याच्या कडेला हँडल लॉक करून स्टॅंडवर उभी होती. तर त्याच्या बाजूला इंद्रजितचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या नाकातून व तोंडातून रक्त आलेले होते तर पायाची बोटांना जखम झालेली होती. रात्री इंद्रजित समवेत जेवणासाठी असलेल्या मित्रांनीच घातपात केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांच्याकडे केली आहे.