पुरंदर ! ...अखेर सोमेश्वर कारखान्याच्या मा. संचालकाला मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे 
पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथील सोमेश्वरचे माजी संचालक यांना मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात जेजुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोमेश्वर करखान्याचे माजी संचालक विजय थोपटे आपल्या पुणे पंढरपूर पालखी मार्गालगत असणाऱ्या शेतातील पपई पिकाच्या पाहणी करता गेले असता शेतामध्ये एक इसम कपऱ्या उर्फ टकल्या घनश्याम शिंदे रा. पिंपरे ता  खंडाळा हा आपल्या होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 11 डीजे 54 20 ची गाडी लावून पपई तोडत होता.  
          पपई का तोडतो म्हणून त्यास विचारले असता त्याने शेतकरी विजय थोपटे यांनाच शिवीगाळ केली व लपून बसणारे आणखी अनोळखी चौघेजण शेतकरी विजय थोपटे यांच्या वरती चाल करून दांडक्याने मारहाण केली.  त्यांना जबर ल मार लागला असून तशी फिर्याद त्यांनी निरा पोलीस स्टेशनला दाखल केली होती यावरून जेजुरी पोलिसांनी कपऱ्या उर्फ टकल्या घनश्याम शिंदे रा. पिंपरे ता  खंडाळा यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 
  वास्तविक शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे तालुक्यातील विहिरीचे स्त्रोत आटत चालले आहेत लाईटचा बोजवारा उडालेला आहे. रात्री बारा वाजता लाईट आली तरी शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. रात्रीपर्यंत शेतात गेल्यावरती अशा चोरांची भीती तर आहेच परंतु आणखी काही जनावरांची भीती देखील शेतकऱ्याच्या मनात असते. बर एवढे कष्ट करून देखील पीक आपले होईल याची शाश्वती नाही. रात्री अप रात्री उभे पिक चोरून नेण्याच्या अनेक घटना घडत आहेत.  त्यास पाय बंद घातला पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
To Top