सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर पब्लिक स्कूल सोमेश्वर नगरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
नुकतेच सोमेश्वर पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन बक्षीस वितरण विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप व्हाईस चेअरमन प्रणिती खोमणे, आनंदकुमार होळकर व संचालक प्रवीण कांबळे, मा. संचालीका मनीषा कदम, विशाल गायकवाड, करंजेपूल गावच्या सरपंच पूजा गायकवाड, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे, सोमेश्वर पब्लिक स्कूलच्या माजी प्राचार्या यु आर वाझा हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
याप्रसंगी शालेय क्रीडा स्पर्धा अहवाल वाचन एस. वाय .कोकरे व शालेय बक्षिस स्पर्धा अहवाल वाचन प्रियंका कदम यांनी केले. वार्षिक अहवाल वाचन शाळेच्या प्राचार्या काकडे यांनी केले त्यानंतर पुरुषोत्तम जगताप यांचे मनोगत झाले मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात कला गुण दर्शनाचा कार्यक्रम खूप आनंदात साजरा झाला त्यामध्ये H.K.G-C चा बुमरो बुमरो, इयत्ता-९ वी च्या विद्यार्थ्यांचा काठी न घोंगड घेऊ द्या की रं, इयत्ता ६ वी चा लंल्लाटी भंडार इत्यादी गाणी खूप सुंदर प्रकारे झाली या कार्यक्रमासाठी शाळेच्या परिवेक्षक पी पी कुलकर्णी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व्ही जी गायकवाड व आभार ए वाय नेवसे यांनी केले शाळेच्या प्राचार्या के एस काकडे यांनी संस्थेचे सिक्युरिटी गार्ड यांनी खूप चांगले काम केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.