सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना ते मुरूम रस्त्यावर वाणेवाडी येथे उसाचे भलेला ट्रॅकर चालू चारचाकी बलेनो गाडीवर कोसळून अपघात झाला आहे.
नशीब बलवत्तर म्हणून गाडीतील पाच जणांचे प्राण वाचले आहेत. सविस्तर हकीकत, उसाने भरलेला ट्रॅकर क्र. एम एच १६ सी.वाय. ७८१२ हा मुरूम च्या दिशेने सोमेश्वर कारखान्याकडे चालला होता. त्याच वेळी बारामती तालुका भाजपचे अध्यक्ष पी के जगताप यांचे जावई जितेंद्र तानाजी मोहिते, मुलगी पायल जितेंद्र मोहिते, नात राजलक्ष्मी जितेंद्र मोहिते, नात जिजाई जितेंद्र मोहिते, सर्व रा.नांदेड सिटी पुणे व पत्नी शोभा प्रकाश जगतात रा.मुरूम ता.बारामती हे जितेंद्र व पायल यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने देव दर्शनावरून बलेनो क्र. एम एच १२ क्यू.टी. ८०९३ या चारचाकी गाडीतून मुरूमकडे जात असताना वाणेवाडी येथील सिनेमा चौकात उसाचे भरलेल्या ट्रॅकरची ट्रॉली चालू गाडीवर कोसळली. प्रसंगावधान ओळखून नागरिकांनी तात्काळ गाडीतील लोकांना बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलिसांनी भेट दिली आहे.