सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर- आंबाडे रस्त्याचे मागील दोन महिन्यांपासून नवीनच रस्ता चारपदरी करण्याचे काम सुरू आहे.१० किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम जलद गतीने सुरू असले तरी ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामावर वेळच्यावेळी पाणी मारले जात नसल्याने धुळीचे लोट उधळत आहेत.
दरम्यान प्रवास करताना वाहनचालक तसेच प्रवाशी यांची प्रवासादरम्यान होत असून धुळीमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना अडथळा येत असल्याने छोटे - मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.
रस्त्याचे काम भोरबाजूने युद्ध पातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ठेकेदारांकडून छोट्या मोठ्या फुलांचे काम केले गेले तदनंतर रस्ता उकरण्याचे काम सुरू आहे.सध्या रस्त्यावर पूर्णतः मातीत मुरूम असल्याने रस्त्यावरील धूळ मोठ्या प्रमाणात उधळत आहे.रस्त्यावरून मोठी गाडी जाऊन धूळ उधळल्यास मागील दुचाकी तसेच छोट्या चारचाकी वाहनचालकाला समोरील काहीच दिसत नसल्याने अपघात होऊ शकतो.नवीन सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर दिवसातून चार ते पाच वेळा पाणी मारले तर धूळ उधळणार नाही.परिणामी अपघातही होणार नाहीत.दरम्यान रस्त्यावर नवनवीन छोटे-मोठे पूल बांधणे सुरू आहे.या पुलांवर आवश्यक तेवढे पाणी मारत नसल्याचे प्रवासी वाहनचालकांकडून सांगण्यात आले.