सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
मुरूम (ता. बारामती) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रदीप कणसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार या पक्षाच्या बारामती तालुका चिटणीस पदी निवड करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवारी बारामती येथे प्रदीप कणसे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
तालुका अध्यक्ष एस. एन. जगताप व अन्य नेते यावेळेस उपस्थित होते. प्रदीप कणसे यांनी तरुण वयात मुरूम ग्रामपंचायतचे सरपंचपद भूषवले आहे. विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर असतो. त्यांच्या नियुक्तीने तालुक्यातून अभिनंदन होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन निवडीनंतर प्रदीप कणसे यांनी दिले.