सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
जनाईच्या पाण्यासंदर्भात येथील शेतकऱ्यांना यापुढे कधीच उपोषण करावे लागणार नाही अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
शेतकरी संघर्ष कृती समितीची बैठक माऊली मंदिर येथे घेण्यात आली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी उपोषणास बसलेले उपोषणकर्ते पोपट खैरे, भानुदास बोरकर आणि सचिन साळुंके यांचा सत्कार सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या भागातील शेतकऱ्यांना यापुढे पाण्यासाठी कधीच आंदोलन करावे लागणार नाही. त्यांचे जे काही पाण्याचे प्रश्न असतील ते निश्चित सोडविले जातील अशी ग्वाही सुळे यांनी दिली.
राज्यात बेरोजगारी, गुन्हेगारी वाढली आहे. मात्र अनेक मंत्री पालकमंत्री मला करा म्हणुन दिल्ली दरबारी हेलपाटे मारतात. मात्र शेतकऱ्याच्या कांदा प्रश्नी मात्र दिल्लीकडे कोणी फिरकत नाहीत असे सुळे यांनी सागितले.
यावेळी आंदोलनकर्ते पोपट खैरे, ज्ञानेश्वर कौले यांनी या भागातील ऊस जळुन चालला आहे. तो लवकर सोमेश्वरने तोडावा अशी मागणी सुळे यांच्याकडे केली. तसेच या भागात उदरनिर्वाहाचे कुठलेच साधन नसल्याने एखादे आयटी पार्क उभारले जावे, त्यासाठी येथील शेतकरी जिरायती जमिनी देतील असे कौले यांनी सांगितले. शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला त्याच्या बारा मागण्या शासनाकडुन तातडीने पुर्ण व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करावेत असे खैरे यांनी सांगितले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, सचिन गुजर, वनिता बनकर, संपतराव काटे, बबन बोरकर, फक्कड भोंडवे, राजेंद्र बोरकर, ज्ञानेश्वर कौले, विजय खैरे, ॲड. दत्तात्रय बोरकर आदीसह शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन नगरे यांनी केले.
......................................
COMMENTS