सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील विकास कामांना मी कधी कमी पडलो नाही आणि ईथुन पुढेही कमी पडणार नाही. तालुक्यात पर्याटन विकास झाला पाहिजे आणि व्यवसाय वाढले पाहिजेत त्यासाठी मी प्रयत्नशिल असून चिपळूणला जोडला जाणारा ५५ किलोमिटरचा रस्ता व्यवसाय वाढीस उपयुक्त आहे. त्यामुळे स्थानिक जनतेने स्वतःच्या जमिनी मुंबईच्या धनिकांना विकून त्यांच्या कडे नोकर होवु नका असे आवाहन आ. श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भामघर ता. जावली येथिल वेण्णा नदीवरील बांधलेल्या पुलाच्या उद्घाटण, म्हाते भामघर रस्त्याचे भुमिपुजन तसेच इतर विकास कांमाच्या उद्घाटण व भुमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बी एम पार्टे पतसंस्थेचे चेअरमन मोहण कासुर्डे , उपानगराध्यक्ष दत्ता पवार मेढेकर , भामघरचे सरपंच विजयराव सावले, सागर धनावडे , रामभाऊ शेलार, जगनाथ वाडकर, हणमंत शिंगटे, शांताराम पार्टे, सरपंच विजय सपकाळ, राजाराम खुडे , रमेश वाडकर, अर्जुन जाधव सुरेश बुवा जवळ, भागोजी पाटील, नाना जांभळे, पोलीस पाटील रामचंद्र सावंत, बबन बेलोशे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले मुनावळे येथे पर्याटण केंद्र होत असुन त्यामुळे पर्याटकांची वर्दळ वाढणार आहे तर त्याठिकाणी मोठा पलिकडील भागाला जोडणार ब्रिज होत असल्याने चिपळणूकडे जाणारे कराड पाटण मार्गे व प्रतापगड मार्गे न जाता आपल्या तालुक्यातुन जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला छोटा मोठा व्यवसाय करता येणार आहे असे आ. भोसले यांनी सांगुन ते पुढे म्हणाले देशाचे पतप्रधान मोदी हे व्यवसाय वाढी साठी वेगवेगळ्या योजना मार्फत आर्थिक मदत करीत आहेत त्याचा लाभ घ्यावा असेही सांगीतले.
ते पुढे म्हणले मी कधीही मतांचे राजकारण केले नाही. भामघर गावात कमी मतदान असताना ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी पुलाचे बांधकाम करून दिले. विकास कामांमध्ये मी कमी पडून दिले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून जो उमेदवार आपल्याला दिला जाईल त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहुन पंतप्रधान मोदींजीचे हात बळकट करण्याचे काम आपणा सर्वांना करायचे आहे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
आ. भोसले यांनी बोंडारवाडी धरणा बाबत बोलताना सांगितले की आपल्याला १ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याने आता आपल्या हक्काचे पाणी कोणी पळवून नेऊ शकत नाही. त्यामुळे शेती करून आपणाला आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळणार आहे. धरणाच्या बाबत सर्व्हे सुरु होवुन ज्यांचे पुर्नवसन करवयाचे त्यांचा प्रश्न प्रधान्याने मार्गी लावणार असल्याचे सांगीतले.
यावेळी सरपंच विजयराव सावले यांनी आमदार साहेबांनी अनेक वर्ष बिकट असणारा व आमच्याकडे मतदान नसल्याने दुर्लक्षीत असणारा पुलाचा प्रश्न सोडविला. त्यामुळे आज आमच्या गावात वाहतुक वाढली आहे. लोकांच्या अडचणी पुलामुळे दुर झाल्या आहेत. तसेच म्हाते ते भामघर रस्ता देवुन आमचा भाग इतर गावांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या रस्त्याची रुंदीकरण करण्यात यावी अशी मागणी सावले यांनी करीत बाबाराजे यांच्या माध्यमातुन आमच्या भागात विकासाचे पर्व उभे राहत आहे त्या बद्दल बाबारांजेचे आभार मानले.
यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ शेलार यांनी केले तर आभार विजय सावले यांनी मानले.
COMMENTS