सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर ; संतोष म्हस्के
भोर शहरातील कोणत्याही विलासकामाला निधी कमी पडू देणार नाही.विकास कामांबरोबरच शहरातील आळी तसेच पेठेंमधील देव- देवतांच्या मंदिरांनाही महत्त्व देऊन त्यांचे सुशोभीकरण करण्याचा मानस समोर ठेवून शहरातील विविध विकास कामांसाठी कायमच कटिबद्ध राहणार आहे.तर सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करू असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोर शहरातील न्हावी - परीट आळी (नवरंग मित्र मंडळ) येथील गणेश मंदिर कलशारोहण स्थिर प्राणप्रतिष्ठापना व प्रासादवास्तु सोहळ्याप्रसंगी आमदार थोपटे रविवार दि.११ बोलत होते.यावेळी राजगड ज्ञानपीठ सचिवा स्वरूपा थोपटे,तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, गीतांजली शेटे,तुकाराम रोमन ,माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे,दत्तात्रय पालकर, ह.भ. प.नवनाथ महाराज लिम्हण,सचिन हर्नस्कर, माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर,उमेश देशमुख,देविदास गायकवाड,समीर सागळे, सुमंत शेटे,गणेश पवार,जयश्री शिंदे,अमित सागळे,पद्मिनी तारू,शशिकांत पालकर,अनिल गिरे,विठ्ठल पालकर,दत्तात्रय पालकर,अध्यक्ष सुरेश धुमाळ,बाळासाहेब धुमाळ,भारती पालकर,रूपाली वर्पे,मनीषा पालकर आदींसह शेकडो महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS